शिधापत्रिका नुतनीकरण शिबिराचा कल्याण ग्रामीणमधील हजारो नागरिकांना लाभ

शिधापत्रिका नुतनीकरण शिबिराचा कल्याण ग्रामीणमधील हजारो नागरिकांना लाभ

कल्याण (प्रतिनिधी)- 
कल्याण पूर्व येथील कुणाल दिनकरशेठ पाटील फौन्डेशनच्या वतीने पिसवली येथील जनसंपर्क कार्यालयात आज (शुक्रवार) शिधापत्रिकांचे नुतनीकरण शिधावाटप कार्यालयाच्या सहकार्याने करून देण्यात आले. यावेळी कल्याण ग्रामीण भागातील हजारो रहिवाशांनी मोठी गर्दी करीत त्याचा लाभ घेतला. 

कल्याण ग्रामीण भागातील रहिवाशांना शिधापत्रिकांचे नुतनीकरण करताना अनंत अडचणी येत असून त्यासाठी त्यांना शिधावाटप कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. या प्रकारांत दलालांचे फावत असल्याने व नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक नेमकी ओळखून प्रभाग क्र. १०८ चे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य कुणाल पाटील यांनी आपल्या कुणाल दिनकरशेठ पाटील फौन्डेशन संस्थेच्या वतीने व शिधावाटप कार्यालयालाच्या सहकार्याने त्यांनी कल्याण पूर्वेत दोन ठिकाणी दोन दिवसीय शिधापत्रिका नुतनीकरण शिबिरांचे आयोजन केले आहे. 

शुक्रवारी नेताजी नगर, पिसवली येथील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नेतिवली, कचोरे, लोकग्राम, पिसवली, चेतना परिसर, टाटा पॉवर, समतानगर, गोळवली, नेताजीनगर, हेदुटणे, कोळे, मल्हारनगर, संदप, सोनारपाडा व देशमुख होम्स परिसरातील हजारो नागरिकांनी शिधापत्रिकाचे नुतनीकरण करून घेतले. यावेळी नकुल भोईर, अनिल पाटील, पांडुरंग चव्हाण, शिधावाटप अधिकारी एकनाथ पवार, सहाय्यक शिधावाटप अधिकारी धरमसिंग बहुरे, रविकिरण बापट, शिधावाटप निरीक्षक सुधीर फडोळे, अमोल गरकल यांच्यासह अन्य कर्मचारीवर्ग उपस्थित होता. शनिवारी नांदिवली येथील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी शिधापत्रिका नुतनीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.