मराठा सेवा संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुभाष पाटील

मराठा सेवा संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुभाष पाटील

देवरुख (प्रतिनिधी) :
मराठा सेवा संघाच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली आहे. २०१९ सालाकरिता संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

शिवाजी चौक येथील शिर्के कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेले उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष- रमेश लक्ष्मण घाग, सदस्य- मंगेश वासुदेव जाधव, राजेंद्र परशुराम नलावडे, पवन तुकाराम सावंत, सुभाष बाळकृष्ण जाधव, ॲड. पूनम चंद्रशेखर चव्हाण, शुभांगी सुभाष पाटील, मारुती रामचंद्र उर्फ काका जोशी. सल्लागारपदी सुनील देसाई यांची निवड करण्यात आली. अन्य रिक्त पदे नंतर भरण्याचे ठरविण्यात आले. यावेळी संघाच्या पुढील वाटचालीबाबत देखील चर्चाविनिमय करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण परब, कोकण विभाग अध्यक्ष नितीन मोकाशी यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.