प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी आनंद मोरे यांची फेरनिवड

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी आनंद मोरे यांची फेरनिवड

कल्याण (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार व अन्य समाजघटका साठी सातत्याने कार्य करणारी व कल्याण डोंबिवली शहर परीसरात गेल्या बावीस वर्षाहून अधिक कालावधी झालेली शासन नोंदणीकृत असलेली पत्रकार संघटना कल्याण प्रेस क्लबची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यात नविन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून लोकमतचे छायाचित्रकार आनंद मोरे यांची फेरनिवड करण्यात आली.

उर्वरित पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष नवभारतचे अशोक वर्मा , सचिव गुजरात समाचारचे  विष्णुकुमार चौधरी, खजिनदार दैनिक दबंग दुनियाचे एस.एन. दुबे, तसेच कार्यकारणी सभासद म्हणून जेष्ठ पत्रकार, कल्याण नागरिकचे अतुल फडके, सामनाचे दत्ता बाठे, कोकण वृत्तांतचे  प्रविण आंब्रे, कल्याण प्रजाराज रवी चौधरी, सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार ठाणे वैभवचे रमेश दुधाळकर, जेष्ठ पत्रकार नविन भानुशाली आदींची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हिताच्या सेवा सुविधा व योजना राबविण्याच्या दृष्टीने माजी अध्यक्ष  नविनभाई भानुशाली, रमेश दुधाळकर आदींनी मार्गदर्शन केले नविन कार्यकारणीला शुभेच्छा देत सचिव विष्णुकुमार चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.