नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार – खा. राजन विचारे

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटचा पुनर्विकास करणार – खा. राजन विचारे

नवी मुंबई (प्रतिनिधी) : 
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे, आश्वासन खासदार राजन विचारेंनी उपस्थित असलेल्या व्यापारी वर्गाला  दिले. नवी मुंबईमधील आशिया खंडातील सर्वात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणारी कृषी बाजार समितीमधील उत्तर भारतीय व्यापारी संघाच्या वतीने दुसऱ्यांदा निवडून आलेल्या खा. विचारे यांचा भव्य जाहीर सत्कार समारंभ एपीएमसी मार्केट येथे आयोजित केला होता. 

यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा,  उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, प्रकाश पाटिल, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक रामदास पवळे, राजेश शिंदे, उपशहरप्रमुख मनोज इसवे, गणपत शेलार, शेषराव आड़े, शिरीष पाटिल, गणेश पावगे, घनशाम पाटे, व्यापारी महासंघ अध्यक्ष कैलास ताजने, सचिव श्यामराव मोहिते आदी उपस्थित होते.

सदर प्रसंगी व्यापाऱ्यांनी ट्रकमधून माल आणताना पोलिसांकडून त्रास होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचा उल्लेख करीत खा. विचारे यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे वचन दिले. बाजार समितीतील व्यापाऱ्यांना पोलिसांकडून काही त्रास होत  असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावाअसे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजक रामाशंकर गुप्ता, मंटु मौर्या, जवाहर गुप्ता, रमेश गुप्ता, अवधेश गुप्ता, सूरज गुप्ता, हीरालाल गुप्ता यांनी खासदार  राजन विचारे यांचा  सत्कार केला. कार्यक्रमाला उत्तर भारतीय व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.