भाजपच्या कल्याण महिला आघाडी अध्यक्षपदी रेखा चौधरी 

भाजपच्या कल्याण महिला आघाडी अध्यक्षपदी रेखा चौधरी 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेतील भाजपच्या नगरसेविका रेखा राजन चौधरी यांची भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली होती. उर्वरित जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कचोरे प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका रेखा राजन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. चौधरी यांनी यापूर्वी महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदही यशस्वीरीत्या  सांभाळले आहे.

रेखा चौधरी यांनी कोरोनाच्या प्रदुर्भावाच्या काळात प्रभागातील गरजू नागरिकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. नागरिकांची कोविड-१९ तपासणी करण्यासाठी देखील रेखा चौधरी यांनी कार्यकर्त्यांसह प्रभागातील घरोघर जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. पक्षाच्या कार्यात देखील सातत्याने सक्रीय असलेल्या रेखा चौधरी यांनी भाजपचे महिला संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.