कल्याण पूर्वेतील गटारावरील स्लॅबची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा

कल्याण पूर्वेतील गटारावरील स्लॅबची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेतील जगतापवाडी येथील मुख्य गटारावरील दुरवस्था झालेल्या स्लॅबची तातडीने पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

कल्याण पूर्वेतील तिसगाव रोडवरील जगतापवाडी येथील सुमन कॉलनी, शिवनेरी कॉलनी, म्हात्रे चाळ या भागातून वाहणाऱ्या मुख्य गटारावरील स्लॅबची दुरावस्था झाली आहे. या स्लॅबवरून परिसरातील रहिवाशांना ये-जा करण्याचा रस्ता आहे. पावसाळ्यात हा स्लॅब कधीही तुटण्याची भीती आहे. त्यामुळे त्यावरून ये-जा करणाऱ्या येथील रहिवाशांना अपघात होऊन गंभीर दुखापत होण्याचा धोकाही असल्याकडे अध्यक्ष जोगदंड यांच्यासह रविंद्र केदारे, वैभव पवार, बाबाजी मोरे आदींनी लक्ष वेधले आहे.