पुरस्कारामुळे कार्य करण्यास बळ मिळते – आ. गणपत गायकवाड 

पुरस्कारामुळे कार्य करण्यास बळ मिळते – आ. गणपत गायकवाड 

कल्याण (प्रतिनिधी) : 
पुरस्कार छोटा असो वा मोठा, मात्र या पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांना काम करण्यास बळ मिळते. प्रत्येक क्षेत्रातील पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्ती नव्या जोमाने व उत्साहाने काम करतात, असे प्रतिपादन कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी बोलताना केले. बुद्धभूमी फाऊंडेशन वालधुनी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या लोकनायककार कुंदन गोटे स्मृती पुरस्कार समारंभात ते बोलत होते. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. साहित्यिक वि. सो. शिंदे हे होते. मंचावर नाना बागुल, रिपाई (आ) चे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे, नांना पवार, पंचशील पवार, शुभम गोटे, बुद्धभूषण गोटे, कार्यक्रमाचे आयोजक मिलींद वानखेडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुनील खांबे आपल्या भाषणात म्हणाले की, 'समाजात काम करताना अनेक कार्यकर्ते उध्वस्त झाले. पण त्यांची काम करण्याची धडपड थांबलेली नाही. आम्हाला नेत्यांमुळे नव्हे, तर समाजात शाहीर व इतर मंडळी कडे बघून काम कारण्याची ऊर्जा मिळते. यावेळी पीआरपीचे राष्टीय सचिव जयदीप कवाडे यांनी सांगितले की, 'आमचे नेते म्हणून मी जोगेंद्र कवाडे, बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले यांचे नाव घेत नाही, तर आमचे एकच नेते आहेत आणि ते म्हणजे विश्वभूषण बाबासाहेब आंबेकर.

यावेळी समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लोकनायकार कुंदन गोटे स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भीमशाहिररत्न पुरस्काराने प्रभाकर पोखरीकर, कार्यसम्राटरत्न भूषण अण्णा रोकडे, साहित्यरत्न समाजभूषण पुरस्कार, प्रा. डॉ. वि. सो. शिंदे यांना, तर पत्रकारभूषण समाजरत्न पुरस्कार वृत्तमानस व महासागरचे प्रतिनिधी बाळकृष्ण मोरे, पुढारीचे सतीश तांबे, सम्राटचे विजय कोकरे, महानायकचे राजू काऊतकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.