शेतकरी आंदोलनाच्या पाठींब्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठाणे येथे आंदोलन

शेतकरी आंदोलनाच्या पाठींब्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठाणे येथे आंदोलन

ठाणे (प्रतिनिधी) : मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्लीमध्ये गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पक्षाने पाठींबा दिला असून सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईचे जिल्ह्याध्यक्ष मारुती खुटवड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

सदर धरणे आंदोलनात  ठाणे विभागीय सचिव हिरालाल केदार, नवी मुंबई महानगर अध्यक्ष जनार्दन शिरावले, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निकम, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष भरत उंब्राटकर, नवी मुंबई जिल्हा सचिव संतोष शिरावले, नवी मुंबई जिल्हा संघटक गणपत पोळ, नवी मुंबई जिल्हा संघटक सुनिल लवांडे, नवी मुंबई जिल्हा संघटक संतोष सिंग राठोड, सुनिता सपकाळ, सरिता खन्ना, अंजू गुप्ता, बाळासो उंब्राटकर, कुणाल लवांडे, सतीष राव, समशुद्दीन शेख, योगेश पाटील, दिपक रावत, विलास जाधव, बंडु पाटील, आदित्य देशमुख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.