कल्याण येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

कल्याण येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

कल्याण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय युवा महासभेच्या वतीने कल्याण येथे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.

कल्याणमधील मुरबाड रस्ता येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय युवा महासभेच्या वतीने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. मराठा सेनेचे प्रदेश अध्यक्ष अरविंद मोरे, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल लोकविद्यापीठाचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय युवा महासभेचे प्रदेश अध्यक्ष संजय हंडोरे यांनी पुष्पहार अर्पण करून वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 

अरविंद मोरे यांनी यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेत त्यांनी भारताची एकात्मता कायम राखण्यासाठी केलेल्या कार्याची महती उपस्थितांना कथन केली. यावेळी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल लोकविद्यापीठाचे महासचिव प्रविण आंब्रे, योगेश पटेल, माहिती अधिकार कार्यकर्ते लईक वलांडीकर, पत्रकार विशाल कुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.