पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे सार्वजनिक वाचनालयाचे आवाहन

पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे सार्वजनिक वाचनालयाचे आवाहन

कल्याण (प्रतिनिधी) : सार्वजनिक वाचनालय कल्याणतर्फे कथा व काव्य संग्रहासाठी देण्यात येणा-या कवी माधवानुज कविता संग्रह व कथाकार दि.बा.मोकाशी कथासंग्रहासाठीचे पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी लेखक, प्रकाशक यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या प्रत्येकी दोन प्रती ५ जानेवरी २०२२ पर्यंत पाठविण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल व सन्मानपत्र असून हा पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. पुस्तकांच्या प्रती सार्वजनिक वाचनालय कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर, कल्याण (प),पिन-४२१३०१ या पत्यावर पाठविण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले आहे. संपर्क-९३२४२७११४६/ ९८१९८६६३४७.