केडीएमसी स्थायी समितीमध्ये ८ नव्या सदस्यांची निवड

केडीएमसी स्थायी समितीमध्ये ८ नव्या सदस्यांची निवड

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) ८ सदस्यांची नावे शनिवारी जाहीर झाली. त्यामुळे १६ सदस्यांच्या समितीमध्ये शिवसेना ८, भाजप ६, मनसे १ व काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे.

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेत शनिवारी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत जयंवत भोईर, शालिनी वायले, दिपेश म्हात्रे, निलेश शिंदे (सर्व शिवसेना विकास आघाडी) तसेच मनोज राय, नितीन पाटील, संदीप पुराणिक (सर्व भाजपा कडोंमपा विकास आघाडी) आणि कस्तुरी देसाई (मनसे) या स्‍थायी समिती सदस्यांच्या निवत्तीमुळे रिक्त‍ होणाया जागांवर शिवसेना विकास आघाडीच्या गोरख जाधव, रजनी मिरकुटे, पुरूषोत्तम चव्हाण, कासिफ तानकी, तर भारतीय जनता पक्ष कडोंमपा विकास आघाडीच्या विकास म्हात्रे, डॉ. सुनिता पाटील, वरूण पाटील आणि तसेच सरोज भोईर (महाराष्‍ट् नवनिर्माण सेना) या सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्याचे पीठासीन आधिकारी तथा उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी जाहीर केले.

स्थायी समितीत शिवसेना विकास आघाडीचे ८ सदस्य, भारतीय जनता पक्ष विकास आघाडीचे ६ सदस्य, महाराष्‍ट् नवनिर्माण सेनेचा १ सदस्य, भारतीय काँग्रेस पक्षाचे १ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.