ईव्हीएम मशीन हॅकरच्या व्हायरल व्हीडीओमुळे खळबळ; आ. गणपत गायकवाड यांची तक्रार

ईव्हीएम मशीन हॅकरच्या व्हायरल व्हीडीओमुळे खळबळ; आ. गणपत गायकवाड यांची तक्रार

कल्याण (प्रतिनिधी) : एकीकडे देशभर मतदान बॅलेट पेपर घेण्यासाठी अंदोलनसह सुप्रीम कोर्टापर्यत ईव्हीएम मशीनवर मतदान नको म्हणून वादविवाद सुरु आहेत. त्यातच सोशल मीडियावर एका ईव्हीएम मशीन हॅकरच्या व्हायरल व्हीडीओमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता ज्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅकिंग करण्याचा व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला. त्या मतदार संघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस व निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे. 

सदर व्हायरल व्हीडीओमध्ये उल्हासनगर परिसरात राहणारा आशिष चौधरी नावाचा व्यक्ती दिसत असून ज्याने कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गायकवाड यांच्या मुलाला सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणून लाखोचा गंडा घातला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी यांच्या मते  ईव्हीएम मशीन हॅकिंग करत  2019 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचा विजय निश्चित होता.  मात्र मी EVM मशीन हँक करून मशिन मधल्या मतामध्ये उलटफेर करून चक्क साडेबारा हजाराने भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजय केल्याचा दावा आशिष चौधरी  केला आहे. 

मात्र याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी आपला त्या व्यक्तीशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत वायरल व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करत नक्की हा  हॅकर कश्या प्रकारे हॅकिंग करतो याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे यासाठी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस व निवडणूक आयोगाकडे त्यांनी चौकशीची मागणी  करून गुन्हा दाखल करण्याच्या  मागणीसाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.