भाजपच्या मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्षपदी शक्तिवान भोईर

भाजपच्या मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्षपदी शक्तिवान भोईर

कल्याण (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पक्षाच्या मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्षपदी शक्तिवान भोईर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा भाजपच्या कल्याण येथील कार्यालयात शनिवारी संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड झाली.

या बैठकीला भाजपचे ठाणे विभाग अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, नगरसेवक मनोज राय, महिला जिल्हाध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शक्तिवान भोईर हे मोहोने टिटवाळा मंडळाच्या मागील कार्यकारिणीत सरचिटणीस होते. बैठकीत मोहोने टिटवाळा मंडळाच्या अध्यक्षपदी भोईर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निवडीबद्दल भोईर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.