छ.शिवाजी महाराजांच्या हस्ते मिळालेले ताम्रपट | हातगड : सुभेदार गागोजीराव मोरे देशमुख इतिहास |

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाशिक येथील लढवय्या किल्लेदार गंगाजी उर्फ गागोजीराव मोरे देशमुख यांनी इसवी सन १६६३ (शके १५८६) रोजी नाशिक येथील हातगड किल्ला महाराजांना जिंकून दिला. त्यावेळी गागोजीराव यांनी गाजवलेल्या शौर्याची दखल घेत महाराजांनी त्यांना १२ गावांची देशमुखी दिली. त्या संदर्भातील ताम्रपट शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातांनी सुभेदार गागोजीराव यांना दिला होता. गागोजीराव मोरे यांचे थेट १३ वे वंशज मनोहर मोरे यांनी आजपावेतो हा शिवकालीन ताम्रपट वंशपरंपरेने जपून ठेवला आहे. हा ताम्रपट सुस्थितीत आहे. या ताम्रपटात शिलालेख, वंशावळी, मोजमाप आदी माहिती आहे. या ताम्रपटाची संपूर्ण माहिती स्वतः मनोहर मोरे देशमुख यांनी दिली, त्याचा बनविलेला हा व्हिडिओ...