डोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना स्थापना

डोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना स्थापना

डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली शहर शाखा व शिवसेना महिला सेना यांच्या प्रयत्नातून शिवसेना घरेलू कामगार संघटनेची सुरुवात डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचे हस्ते करण्यात आली. 

घरेलु कामगारांचे अनेक प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी तसेच त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना मजबूत आधार देण्यासाठी शिवसेना घरेलु कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे शिवसेना डोंबिवली ग्रामीण महिला संघटक कविता गावंडे यांनी सांगितले, यावेळी अनेक महिलांनी अर्ज भरून या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. याप्रसंगी माजी नगरसेविका मंगला सुळे, माजी सभापती राजेश कदम, कार्यालय प्रमुख सतीश मोडक, विवेक खामकर महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.