ठाणे येथील सुष्मिता देशमुखला ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य

ठाणे येथील सुष्मिता देशमुखला ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य

ठाणे येथील सुष्मिता देशमुखला ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य

ठाणे (प्रतिनिधी) :
मूळची रायगड जील्ह्यातील सुधागड तालुक्यातील असलेल्या व सध्या ठाण्यालगतच्या विटावा येथे राहणाऱ्या सुष्मिता सुनिल देशमुख (२३) हिने १७ जून रोजी केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात सुष्मिताची निवड निश्चित झाली आहे.

पॉवरलिफ्टिींगसारख्या अवजड क्रीडा प्रकारात विटावा येथील एका सामान्य कुटुंबातील सुष्मिता राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिींग स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. १७ जून २०१९ रोजी केरळ येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे.  यापूर्वी दुबईतील आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतही तिने उत्तम कामगिरी बजावली आहे. 

विशेष म्हणजे सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये ५ सूवर्ण पदकासह ३२ पदकांची कमाई केली आहे. सध्या ती गोवेलीतील जीवनदीप कॉलेजमध्ये एम.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ती कारभारी जिममधून प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक विनायक कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही सुष्मिता जिद्दीने खेळत आहे. सुधागड तालुक्यातील वाघोशी गाव येथील रहिवासी असल्याने सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सुष्मिताला उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.