सुहास राणे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार 

सुहास राणे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार 

मुंबई (प्रतिनिधी) : साप्ताहिक प्रजेचे शिवराज्य व मासिक विर जनसेनाचे संपादक सुहास लक्ष्मण राणे यांना पत्रकारिता आणि सामाजिक योगदानाबद्दल विशेष पुरस्कार यांना पत्रकारितेतील व सामाजिक योगदानाबद्दल अभिजीत राणे युथ फौंडेशनच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

अभिजीत राणे युथ फौंडेशन आयोजित वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गोरेगाव येथील केशव गोरे ट्रस्ट हॉलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी वृत्तपत्रलेखक व साप्ताहिक ‘प्रजेचे शिवराज्य’ व मासिक ‘विर जनसेना’चे संपादक सुहास लक्ष्मण राणे यांना पत्रकारितेतील व सामाजिक योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले.  

याप्रसंगी विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठी बिग बॉस फेम सुप्रसिद्ध गगनभेदी व्यक्तिमत्व अनिल थत्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, धडक कामगार युनियनचे अध्यक्ष व आयोजक अभिजित राणे, माजी नगरसेवक विनोद शेलार, जेष्ठ राजकीय समीक्षक अशोक राणे, दैनिक मुंबईच्या संपादिका अनघा राणे, वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आपल्या खुमासदार शैलीत व अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, समाजसेवक गणेश हिरवे यांनी केले. या कार्यक्रमास  महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच वृत्तपत्रलेखक मोठया संख्येने उपस्थित होते.