कोविड-19 संसर्गाबाबत जनजागृतीसाठी धिरेश हरड़ यांचा विशेष गौरव 

कोविड-19 संसर्गाबाबत जनजागृतीसाठी धिरेश हरड़ यांचा विशेष गौरव 

कल्याण (प्रतिनिधी) : कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात कोविड-19 चे रुग्ण आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात दिल्याने कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते, पांडुरंग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धिरेश पांडुरंग हरड़ यांचा भारत सरकारच्या मान्यताप्राप्त ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ साईंस संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे.

कोविड-19 आजाराच्या संसर्गाबाबत जनजागृती आणि गरजूंना प्रत्यक्षात मदतीचा हात देणाऱ्या काम करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन नुकताच गौरव करण्यात आला. त्यात कल्याणकर आलेल्या मात्र मुळचे मुरबाडकर असलेले पांडुरंग प्रतिष्ठान, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धिरेश पांडुरंग हरड़ यांनी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कार्याचा ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ साईंसच्या वतीने विशेषत्वाने गौरव करण्यात आला.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना कोरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक साहित्याचे हरड यांनी सहकाऱ्यांच्या साथीने मुरबाडच्या ग्रामीण भागात वाटप केले. त्याचप्रमाणे उद्भवलेल्या आर्थिक अडचणीमध्ये गरजू नागरिकांना अन्नधान्याचे किट वितरण करण्यात देखील त्यांनी पुढाकार घेतला.  

धिरेश हरड़ यांच्या कामाची विशेषत्वाने दखल घेत सामाजिक न्यायाचे पक्षधर डॉ. शोकीन वर्मा यांनी हरड़ यांना अवॉर्ड सर्टिफिकेट ईमेलद्वारे प्रदान करीत सन्मानित केले. दरम्यान, धिरेश हरड़ यानी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विशेष करून किसन बोदरे, अतुल माळी, बाळाराम भावार्थे, पांडुरंग प्रतिष्ठानच्या महीला विभागाच्या अध्यक्षा दिक्षीता हरड, संगीता पष्टे,  नितीन शिंदे, संतोष साबळे,  दिनेश शिंदे, विलास साबळे, दिपक हरड, शिवाजी फोडसे, भरत फोडसे, गुरुनाध भोईर, सागर शिंदे, चंदु हरड़, प्रकाश फोडसे, संचित शिंदे, गणेश फोडसे,  मयूर साबळे, राजेश हरड़,  बबलु साबळे, सुशांत शिदे, बाळा साबळे, सुजीत शिंदे, विवेक हरड, विजय हरड, मदन हरड, विशाल फोडसे, महेन्द्र फोडसे, मंगेश फोडसे, जगदीश फोडसे, दिपक साबळे, शैलेश फोडसे, कमलाकर शिंदे, महेश शिंदे, अरुण शिंदे, सुनील  साबळे, मोतीराम भोईर, ज्ञानेश्वर कराले, करण शिंदे, सोमनाथ कराले, ज्ञानेश्वर शिंदे, गुरुनाथ सुरोशे, जयवंत सुरोशे, विक्रम हरड़, प्रकाश सुरोशे, सतीश फोडसे, बाळा सुरोशे, किरण साबळे, अरुण फोडसे, कैलाश साबळे, सचिन फोडसे, अंकुश शिंदे, विठ्ठल जवक, वसीम शेख, प्रकाश भिसे, ईजाज शेख़ आदींनी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले केले. आपला हा सन्मान आपल्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे हरड यांनी म्हटले आहे.