वपोनि प्रकाश बिराजदार यांना सुवर्ण पदक

वपोनि प्रकाश बिराजदार यांना सुवर्ण पदक

पनवेल (प्रतिनिधी) : 
पोलीस खात्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवित गुन्हेगारांवर वचक ठेवत पोलीस खात्यात जनतेची सेवा करणारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  प्रकाश  बिराजदार यांना २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती पुरस्कार त्यांना त्यांच्या  चांगल्या कामामुळे  जाहीर झाला. 

बिराजदार हे रायगड जिल्ह्यातील संवेदनशील ओळखला जाणार्‍या म्हसळा पोलीस ठाण्यात  वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच हिंदु-मुस्लिम एकतेचे बीज त्या ठिकाणी  त्यांनी रोवून सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून म्हसळ्याची रायगड जिल्ह्यात  ओळख  निर्माण  करण्यात ते यशस्वी झाले. म्हसळयातील सर्व सामान्य तळागाळातील  जनता आजही त्यांचे एक चांगला अधिकारी  म्हणून  नाव घेेत आहेत. बिराजदार यांनी पनवेल, कुडाळ, तुळींज आदी अनेक पोलीस ठाण्यात चांगले काम केल्याने त्यांची पोलीस  खात्यातील प्रतीमा वाखाणण्याजोगी आहे.

मुंबई येथील राज्य पोलीस मुख्यालयात नुकत्याच झालेल्या एका शानदार कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते बिराजदार यांना सुवर्ण पदक  प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास अनेक पोलीस अधिकारी, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचीव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल आदी मान्यवर  उपस्थित होते.