दहागांव संयुक्त वन व्यवस्थापन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार

दहागांव संयुक्त वन व्यवस्थापन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार

वासिंद (प्रतिनिधी) : 
दहागांव संयुक्त वन व्यवस्थापन समितीला तिसऱ्या क्रमांकाचा प्राप्त झालेला संत तुकाराम वनग्राम हा राज्य शासनाचा राज्य स्तरीय पुरस्कार नुकताच चंद्रपूर येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्विकारण्यात आला.

संत तुकाराम वनग्राम योजनेर्तंगत वन विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात यावर्षीच्या  या समितीला ठाणे जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर राज्य स्तरावर मुल्यांकन होऊन राज्यातील १२ हजार ६६१ गावातील समित्यांमधून ठाणे जिल्ह्यातील वासिंद जवळील दहागांव या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळाला. सदर समितीने वनांचे संरक्षण, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई आदिंचा प्रतिबंध करून जनतेमध्ये वनांचे महत्त्व पटवून देणे यासारखी सोपवलेली कामे केली आहेत.

चंद्रपूर येथे झालेल्या आयोजित कार्यक्रमात वनराज्य मंत्री परिनय फुके, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख यु.के. अग्रवाल, नितीन काकोडकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, दिड लाख रुपये बक्षीस म्हणून देऊन सत्कार करण्यात आला. सदर, सत्कार प्रसंगी शहापूर उपवनसंरक्षक व्हि. टी. घुले, वनक्षेत्रपाल पी.आर.चौधरी, वन समिती अध्यक्ष सोनू देसले, उपसरपंच सुधीर देसले, वनपाल डी. ए. शिंदे, वनरक्षक व्ही. डी. फाळे, कृष्णा परटोले, बाळकृष्ण देसले, काथोड देसले, रवींद्र वावरे, सचिन मांडवी, राजेंद्र जामदार आदी समिती पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.