मिलिंद पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

मिलिंद पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

कल्याण (प्रतिनिधी) : शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यातील भरीव योगदानाबद्दल कल्याण तालुक्यातील आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय शाळेतील शिक्षक मिलिंद रूपचंद पाटील यांना शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ शिक्षक दिनी जाहीर झाला आहे.

श्री. आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय कल्याण येथील शाळेत विज्ञान प्रदर्शन, क्रिडा, विविध प्रकारचे स्पर्धा, तंबाखुमूक्त शाळा, शैक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय व वैशिष्ट्ये पूर्ण कार्याची दखल घेऊन शैक्षणिक दीपस्तंभ या संस्थेकडून २०२१ चा मिलिंद रूपचंद पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, पालक मित्रपरिवार सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.