गावांच्या विकासासाठी राज्यव्यापी निबंध स्पर्धा

गावांच्या विकासासाठी राज्यव्यापी निबंध स्पर्धा

खेड-रत्नागिरी (प्रतिनिधी) : 
लॉक डाऊनमुळे थांबलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा व राज्यातील गावांच्या विकासाच्या नवनवीन कल्पना पुढे याव्यात या उद्देशाने लोटे-खेड येथील ग्रीन वर्ल्ड फाऊडेशनच्या वतीने माझ्या सुंदर गावाच्या कल्पना अथवा माझे सुंदर गाव या विषयांवर आधारित राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातील कोणत्याही गावातील गावकरी या स्पर्धत भाग घेऊ शकतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

माझे गाव हे जगात सुंदर हवे. ते निसर्गरम्य व रोजगार निर्मितीक्षम असावे. गावातील शेती,  पुरातन मंदीरे, नदी-ओढे, गुहा,  देवराई-जंगल, निसर्गसंपन्न, गावचे व वाडी-पाड्यावरील सुंदर रस्ते, फुलाच्या झांडानी नटलेले, स्वच्छ-आरोग्य संपन्न अशा बाबीचे वर्णन करणारा ‘माझे सुंदर गाव’ व ‘माझ्या सुंदर गावाच्या कल्पना’ या पैकी कोणत्याही एका विषयावरील निबंध मराठी किंवा हिन्दी भाषेत लिहून पाठवावा. निबंधासाठी अक्षर चांगले असावे व प्रामाणिकपणे निबंध लिहिलेला असावा. निबंध जास्त मोठा नसावा. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस तिन हजार रुपये, तिसरे बक्षिस  दोन हजार रुपये, तसेच पाच स्पर्धकांना उत्कृष्ट निबंधासाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात येईल अशी माहिती ग्रीन वर्ल्ड फाऊडेशनचे अध्यक्ष राजु आंब्रे यांनी दिली आहे.

स्पर्धकांनी आपले निबंध १ जुन ते ३० जुनपर्यंत ग्रीन वर्ल्ड फाऊडेशन, लोटे आम्रपाली बाग, लोटे, मुंबई-गोवा रोड, एचपी पेट्रोल पंपासमोर, लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी, पिन ४१५७२२ या पत्त्यावर अथवा वाटस अॅप ९५६१२१६६७७ (राजु आंब्रे) ९२७३२९४१२८ (विलास आंब्रे) या क्रमांकावर पाठवावा. यथावकाश स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल व श्री गणेशोसत्वात स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.