महाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना समर्पण संस्थेची मदत

महाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना समर्पण संस्थेची मदत

महाड (प्रतिनिधी) :
मुंबई येथील समर्पण सामाजिक या समाजसेवी संस्थेच्या वतीने नुकतेच महाड तालुक्यातील कोंझर व कुम्भार्डेवाडी-विण्हेरे येथील शेकडो शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अन्य गरजू विद्यार्थ्यांना देखील तातडीची आर्थिक मदत संस्थेमार्फत देण्यात आली.

कोझर येथील श्री वाघजाई मंदिराच्या प्रांगणात स्थानिक ग्रामस्थांच्या पाल्यांना इयत्ता पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांना समर्पण संस्थेच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आले. तसेच दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या (कोंझर)  इयत्ता पाचवी ते  दहावी पर्यंतच्या  विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपही करण्यात आले. तसेच दहावीमधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुणगौरव करण्यात आला. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण दादा पवार, कोंझर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भद्रीके, सदस्य चंद्रकांत महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

कुम्भार्डेवाडी-विण्हेरे  येथील आदिवासी वाडीमधील आदिवासी समाजाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या ६० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर हलकुंतिकर यांनी समर्पण सामाजिक संस्थेने गरजू  विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचे कौतुक करीत आभार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आपल्या भाषणात  या दुर्गम भागात शैक्षणिक क्षेत्रास आपले कार्यक्षेत्र निवडून प्रामाणिकपणे आदिवासी मुलांना शिक्षण देवून त्यांच्या जिवनाचा पाया मजबूत करणाऱ्या शाळेच्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले व या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यास संस्था नेहमी मदतीस येईल असे आश्वासीत केले 

यावेळी आपल्या पाल्याला इंजिनीयर करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुषमा व अरविंद वाडकर या पालकांनाही तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत स्वीकारताना कु. ओंकार अरविंद वाडकर या विद्यार्थ्याने अथक परिश्रम घेवून उत्तम श्रेणीत इंजिनियर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि समर्पण सामाजिक संस्थेचे आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश कदम, सल्लागार आनंद मगर, सचिव मंगेश पवार, सहसचिव सुनील कूमकर, सदस्य हरेष मोरे, उण्मेश कदम, संजय सकपाळ, महेंद्र वालगुडे, नितीन शेडगे, रामचंद्र कडू, विद्या कदम, मनीषा पवार, लता मानकर, साक्षी मगर, माधुरी पवार, भारती कदम, संध्या कूमकर, साक्षी हरेष मोरे, कार्तिक देवगीरकर, वसंत सकपाळ, चंद्रकांत कदम आदी उपस्थित होते.