एक हजार रिक्षांवर पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

एक हजार रिक्षांवर पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

कल्याण (प्रतिनिधी) : दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डोंबिवलीतील लाल बाबटा रिक्षा युनियनने या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी एक हजार रिक्षावर "जय जवान जय किसान" असे पोस्टर लावून या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे.

शेतकरी आंदोलन पेटले असून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीची नाकेबंदी करीत केंद्र सरकारला झुकवीत बोलणी करण्यासाठी बाध्य केले आहे. अगोदर हे शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने आपली यंत्रणा राबविली होती. शेतकऱ्यांना बेरिकेट लावून राज्यांच्या सीमेवरच अडविण्यात आले होते. थंडी असताना या शेतकऱ्यावर थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले होते. पण अशी परिस्थिती असताना शेतकरी आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचे दिसून आल्याने आता केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर बोलणी करण्यास तयार झाले आहेत.

या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत असून आता डोबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियन ही या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविण्या साठी मैदानात उतरली आहे. यापूर्वीराज्य मंत्री मंडळात असलेले राज्य मंत्री असलेले बच्चू कडू यांनी या शेतकरी आंदोलना बाबत तोडगा न निघाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह दिल्लीला कूच करण्याचे जाहीर केले होते.  डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा युनियनने या आंदोलना पाठींबा दर्शविल्याने आता या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचल्याने चित्र दिसून येत आहे.