ठाण्यातील सुश्मिता देशमुखला दिल्लीतील राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत २ सुवर्ण

ठाण्यातील सुश्मिता देशमुखला दिल्लीतील राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत २ सुवर्ण

ठाणे (प्रतिनिधी) :
ठाण्यातील विटावा परिसरात राहणारी बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिने दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय इक्विप्ड क्लासिक बेंच प्रेस स्पर्धेतील ४३ किलो वजनी गटात २ सुर्वण पदके पटकावली.

सदर स्पर्धा दिल्ली येथे दि. २४ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ठाण्यातील कारभारी जिमच्या सुश्मिता देशमुख हिने राष्ट्रीय इक्विप्ड आणि क्लासिक बेंच प्रेस स्पर्धेत ४३ किलो वजनी गटात दोन्ही स्पर्धेतील आधीचे विक्रम मोडून सुश्मिताने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.

यापूर्वी सुश्मिता देशमुखने केरळमधील नॅशनल ज्युनीअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक, दुबईतील इंटरनॅशनल बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्णपदक तसेच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आजवर पाच सुवर्णांसह ४९ पदकांची कमाई केली आहे. तिच्या पॉवर लिफ्टिींग स्पर्धेतील यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.