‘तो’ वॉर्डबॉय, नर्सेस, सुरक्षा रक्षक, आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करा; मनसेची मागणी

‘तो’ वॉर्डबॉय, नर्सेस, सुरक्षा रक्षक, आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करा; मनसेची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात वॉर्डबॉयने रुग्णाच्या नातेवाईकांना केलेल्या शिवीगाळचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. रात्री मद्य प्राशन करून कर्तव्यावर येणाऱ्या वॉर्डबॉय आणि तेथे रात्रपाळीत काम करणाऱ्या नर्सेस, सुरक्षा रक्षक, आरोग्य अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

रात्री मद्य प्राशन कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यास रोखण्याची जबाबदारी तेथील सुरक्षारक्षक आणि आरोग्य अधिकाऱ्यांची आहे. आरोग्य सेवेचे व्रत घेतलेल्या कर्मचारी, नर्सेस, वॉर्डबॉय रुग्णांच्या नातेवाईकान सोबत उद्धटपणे बोलू कसे शकतात. असा प्रकार अनेक वेळा कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात घडला असून आता शास्त्रीनगरला घडला. मात्र हे वायरल झालेल्या व्हिडीओने स्पष्ट झाले की रुग्णाच्या नातेवाईकांन सोबत आरोग्य कर्मचारी कसे वागतात. असे प्रकार कुठे तरी थांबले  पाहिजे आणि रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पालिकेच्या वतीने मिळाली पाहिजे, तसेच हा घडलेला प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शास्त्रीय नगर रुग्णालयात त्या दिवशी रात्र पाळीत असलेल्या नर्सेस, वॉर्डबॉय, कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि आरोग्य अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी रुपेश भोईर यांनी केली आहे.