वालधुनी नदीच्या संरक्षणासाठी प्रतिकात्मक साखळी आंदोलन

वालधुनी नदीच्या संरक्षणासाठी प्रतिकात्मक साखळी आंदोलन

कल्याण (प्रतिनिधी) : जागतिक जल दिनाचे निमित्त साधून सोमवारी कल्याण येथील अकरा सुवासिनींनी वालधुनी नदीच्या पत्रात उतरून नदीचे पूजन केले. हलगर्जीपणा न करता पुढील काळात वालधुनी नदीच्या स्वच्छता व संवर्धनासाठी लक्ष घालण्याची सुबुद्धी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना मिळो, अशी प्रार्थना करीत नदीच्या संरक्षणासाठी प्रतिकात्मक साखळी आंदोलन यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आले. 

वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या वतीने शहाड येथे नदीच्या पात्रात नदीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा समितीचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत दायमा, उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘जन जनने अब ठाना है, वालधुनी नदी अब बचाना है’ असा नारा दिला. 

समितीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, सचिव गणेश नाईक यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी नदीच्या संरक्षणासाठी यावेळी प्रतिकात्मक साखळी आंदोलन केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन समितीचे कार्याध्यक्ष सुनिल सिताराम उतेकर यांनी केले. याप्रसंगी वासंती जाधव, सीता नाईक, जयश्री सावंत, भरत गायकवाड, विनोद शिरवाडकर, पंकज डोईफोडे, मोटू जाधव, विराज गायकवाड, उषा दिसले, भक्ती साळवी, सुनिता भागवत, नयना नायर, करुणा झाल्टे, स्मिता पवार, करुणा शंकर मिश्रा, आशीष तिवारी, कैलाश तवर, राम गणेश मिश्रा, पूनमचंद नाईक, वंदना वर्मा, संध्या फडतरे आदी उपस्थित होते.