डोळ्यांची काळजी घेऊन नेत्रविकार टाळावेत - परेश भोईर 

डोळ्यांची काळजी घेऊन नेत्रविकार टाळावेत - परेश भोईर 

डोंबिवली (अक्षय शिंदे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ५१, ५२ आणि ५६ मधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र चिकित्सा, तसेच चष्मेवाटप शिबिराचे आयोजन डोंबिवली येथे शनिवारी करण्यात आले होते. पश्चिमेतील अमोघसिध्दी हॉल येथे संपन्न या शिबिराचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोपिनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपशहर अध्यक्ष परेश जनार्दन भोईर आणि प्रितेश प्रवीण म्हामुनकर यांनी सदर भव्य शिबिराचे आयोजन केले होते. सध्याची शिक्षण पद्धत पाहता ऑनलाईन शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य ठरत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅबलेट तसेच लॅपटॉपवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडत असल्याने त्यांच्यात डोळ्यां संबंधी विकार वाढत असल्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी आपल्या डोळ्यांची प्रतिबंधात्मक काळजी घेऊन नेत्रविकारांना आमंत्रण देणे टाळावे, असे आवाहन परेश भोईर यांनी याप्रसंगी केले

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या काळजी बाबत सजग राहिले पाहिजे. काही त्रास होण्या आधीच वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत, असा सल्ला दिला. सदर शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

यावेळी माजी नगरसेविका सरोज प्रकाश भोईर, विभाग अध्यक्ष मधुर वालीपकर, प्रतीक किर्लोस्कर, संकेत सावंत, शाखा अध्यक्ष मंदार हळदणकर, विक्रांत नलावडे, राजेश दातखिळे, गजानन पाटील, भूषण घाडी, अभिजीत मोहिते आदी मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.