कल्याण-डोंबिवलीतील ५०० चौ. फुट घरांसाठी करमाफीचा ठराव करा- राजेश मोरे

कल्याण-डोंबिवलीतील ५०० चौ. फुट घरांसाठी करमाफीचा ठराव करा- राजेश मोरे

डोंबिवली (प्रतिनिधी) :
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील ५०० चौ. फुटा पर्यंतच्या घरांसाठी कर माफ करण्याचा ठराव करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना कर माफ करण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी राज्य शासनाने घेतलेल्या सदर मान्यतेचे स्वागत करीत कल्याण डोंबिवलीतील ५०० चौ. फुटा पर्यंतच्या घरांना कर माफी देण्याची मागणी केली आहे. 

महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिलेल्या निवेदनात मोरे यांनी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौ. फुटा पर्यंतच्या घरांसाठी करमाफीचा करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अंमलात आणण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे त्यांनी महापौरांनाही निवेदन देत येत्या महासभेत या विषयाचा प्रस्ताव मांडून ठराव मंजूर करण्यात यावा व तसा प्रस्ताव महाराष्ट्र शासनांकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.