पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या साहसधारकांचा तहसील कार्यालयात सन्मान !

पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या साहसधारकांचा तहसील कार्यालयात सन्मान !

वासिंद (पंडीत मसणे) : 
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधन सण शहापूर तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून पूरस्थितीमध्ये लोकांना मदत करणाऱ्या साहसधारकांचा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सन्मान करण्यात आला.

ऑगस्ट महिन्याच्या दि. ३ व ४ रोजी शहापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वासिंद पूर्व भागातील भातसई, पाठरी वाडी, वृंदावन सोसायटी आदी या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवून नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्रशासनास बहुमुल्य मदत केल्याबद्दल शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते दता ठाकरे, विकास शेलार, मोहन कंठे, गुरुनाथ ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव, माजी सरपंच-उपसरपंच राजेंद्र म्हसकर, विलास पाटील, राजेंद्र भेरे, सामाजिक कार्यकर्ते सतिश गायकर, तानाजी जाधव, कोंडूराम शेलार या साहसधारकांचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहापूर तहसीलदार रविंद्र बाविस्कर, आमदार पांडुरंग बरोरा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला असल्याचे साहसधारक दता ठाकरे यांनी सांगितले.