ठाणे : विधानसभेच्या १८ मतदारसंघातील २५१  उमेदवारांचे अर्ज वैध

ठाणे : विधानसभेच्या १८ मतदारसंघातील २५१  उमेदवारांचे अर्ज वैध

ठाणे (प्रतिनिधी): 
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छानणी करण्यात आली. जिल्ह्यातील विधानसभेच्या अठरा  मतदार संघासाठी २५१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. 

विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे, भिवंडी ग्रामीण - ९, शहापूर - १०, भिवंडी (प.)- ८, भिवंडी पूर्व - १९, कल्याण (प.) - २२, मुरबाड  - ८, अंबरनाथ - १९, उल्हासनगर  - २१, कल्याण पूर्व - २०, डोंबिवली - ६, कल्याण (ग्रा.) - १६, मीरा भाईंदर - १४, ओवळा-माजिवडा - १४, कोपरी-पाचपाखाडी - ११, ठाणे - ०६, मुंब्रा-कळवा - १६, ऐरोली - १३, बेलापूर - १९. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्यानंतर विधानसभा मतदारसंघांमधील लढतींचे चित्र स्पष्ट होईल व निवडणूक प्रचाराला आणि मोर्चेबांधणीला वेग येईल.