फ्रिडम सायक्लोथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फ्रिडम सायक्लोथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने रविवारी आयोजित केलेल्या ‘ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन रँली’ला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सायकल रॅलीचे उदघाटन महापालिका मुख्यालय येथे उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, सभागृह  नेते अशोक वैती, नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक राजेश मोरे, अतिरिक्त आयुक्त तथा ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, क्रिडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.

रविवारी सकाळी ६.३० वा. महापालिका मुख्यालय ते गेट वे आँफ इंडिया व येथून सकाळी  "ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन हे ७५ किमीच्या रँलीला सुरूवात झाली. ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया आणि परत  ११.०० वा. ही सायकल रँली ठाण्यात दाखल झाली. या रँलीत महिला सायकल स्वार देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. तसेच हिरानंदानी मेडोस येथे सकाळी ७.०० ते सकाळी ८.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या  ‘ठाणे - कार फ्रि रॅली सायकल टू वर्क’ या रँलीचा शुभारंभ खासदार राजन विचारेे यांच्या हस्तते करण्यात आला.

वाहनांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी सायकलचा वापर दैनंदिन करणे आवश्यक आहे, प्रत्येकाने जर सायकलचा वापर करण्याचे ठरविले तर निश्चितच आपण प्रदूषण मुक्त ठाणे शहर करू, असा विश्वास व्यक्त करीत उपमहापौर पल्लवी कदम यांनी रँलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. तसेच हिरानंदानी मिडोज येथे आयोजित केलेल्या सायकल रँली दरम्यान राष्ट्रीय, राज्य स्तरावर विशेष कामगिरी केलेल्या प्रसाद खैरनार, गुरुप्रित सिंग, नारायण बारसे, सौदामिनी, चंद्रकांत जाधव, रेहाना शेख, सुब्रमण्यम, सुपर्णा चक्रवर्ती सिंग, स्वराज गावडे, अमित मित्तल, प्रविण कुमार कुलथे, अरूणा लागू, सरप्रीत नारू यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० या वेळेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात "ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन"चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ६.३० ते सकाळी ८.०० या वेळेत 'ठाणे जुनिअर चॅम्प" विहंग वॅली येथे तर सकाळी ६.३० ते सकाळी ८.०० या वेळेत " ठाणे - फ्रिडम सायकल रिपेअर क्लिनिक आणि हेरिटेज सायक्लोथॉन" शहरातील तलावपाळी, कोपिनेश्वर मंदिर, सेंट जॉन व मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.