नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भाल येथे टाळमृदूंगाच्या गजरात आंदोलन

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भाल येथे टाळमृदूंगाच्या गजरात आंदोलन

कल्याण (प्रतिनिधी) : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी कोळी कुणबी समाजाचे झुंजार नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी नुकतेच कल्याण येथून जवळच असलेल्या श्री मलंग रोडवरील भाल येथे टाळ मृदूंगाच्या गजराने साखळी आंदोलन करण्यात आले.

अन्याय हा अन्यायच असतो. मग तो कोणावरही असो. कुठल्याही परिस्थितीत तो सहन करता कामा नये. त्याचा बिमोड केलाच पाहिजे, असा विचार जनतेत रुजविणाऱ्या लोकनायक दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई येथील विमानतळाला दिले गेले पाहिजे, अशी ठाम मागणी करीत भाल येथे वारकरी संप्रदायाकडून सदर आंदोलन प्रसंगी करण्यात आली. शासनाचे मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे निर्देशाचे पालन करीत हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जीवन मढवी, बळीराम म्हाञे, शरद म्हाञे, सुनील राणे, बाळाराम म्हाञे, किसन म्हाञे, दशरथशेठ चिकणकर, अमित चिकणकर, समीर म्हाञे, तुळसीराम म्हाञे, यशवंत पावशे, अशोक सोरखादे आदींसह असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भाग घेतला. अशा प्रकारचे आंदोलन श्री मलंग रोड परिसरातील नांदीवली, काकाचा धाबा, द्वारली, नेवाळी नाका आदी ठिकाणी करण्यात आले. आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याचे यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.