ठाणे येथील कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ऑगस्टमध्ये

ठाणे येथील कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ऑगस्टमध्ये

ठाणे (प्रतिनिधी) : 
मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाच्या मदतीने ठाणे येथील घोडबंदर रोडवरील कासारवडवली  येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात ठाणे येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत सदर रुग्णालयाचे भूमिपूजन येत्या ऑगस्टमध्ये करण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे.

याबाबत आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कासारवडवली येथे हे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा हस्तांतरीत करणे, तसेच रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याबाबत व इतर बाबींवर महत्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा येत्या ऑगस्टमध्ये करण्यात येणार असल्याचेही जवळपास निश्चित करण्यात आले. 

सदर बैठकीस महापौर मिनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, टाटा कॅन्सर मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व संजीव सूद यांच्यासह नगसेवक एकनाथ भोईर, संतोष वडवले, नरेश मणेरा, दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, तसेच जितो या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कॅन्सरचे रुग्णालय ही नागरिकांची गरज असून हे रुग्णालय मध्‍यवर्ती ठिकाणी उभारण्‍्यात येत असल्याने याचा फायदा जवळपासच्या नागरिकांना होऊ शकेल. रुग्णालयास मान्यता मिळण्‍्यास कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सदर  रुग्णालयास शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यत महापालिकेतर्फे आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्‍्यासाठी आवश्‍यक तरतूद करण्‍्यात येईल, असे आयुक्त संजीव  जयस्वाल   यांनी यावेळी नमूद केले.