सोनटक्के-रोहिने रस्त्याची दूरवस्थेने वाहनचालकांचे हाल

सोनटक्के-रोहिने रस्त्याची दूरवस्थेने वाहनचालकांचे हाल

भिवडी (रोहिदास पाटील) : भिवडी तालूक्यातील सोनटक्के रोहिने या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनचालवताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

भिंवडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अतर्गत येणाऱ्या या रस्त्याकडे संबधित अधिकारी रस्त्याच्या दूरवस्थेकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करताना दिसत आहेत. या रस्त्याचे डाबरीकरण न केल्यामूळे दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून जाताना रिक्षा, कार, दूचाकी वाहनांचे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत.

कवाड ग्रामपंचायत कार्यक्षेतात येणाऱ्या सोनटक्के-रोहिने रस्त्यावर साकावजवळ मोठे भगदाड पडले आहे. रात्री -अपरात्री वाहन त्यामध्ये पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. या रस्त्याची दूरूस्ती करण्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचेही लक्ष नसल्याने येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सोनटक्के-रोहने रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते. रोहिने हे गांव माजी सैनिकांचे गांव म्हणून ओळखळे जाते. देशासाठी सिमेवर लढणा-या सैनिकांच्या गावातील रस्त्याची दूरवस्था झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सदर रस्त्याचे गणेशोत्सवात्सवापूर्वीच दूरूस्ती करण्यात यावी अशी मागणी कवाड ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन शेलार व संजय कदम विनोद कदम यांच्यासह सोनटक्के-रोहिने गावातील ग्रामस्थांनी भिंवडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.