देशातील पहिली अत्याधुनिक काचबिंदु शस्त्रक्रिया ठाणे येथे संपन्न

देशातील पहिली अत्याधुनिक काचबिंदु शस्त्रक्रिया ठाणे येथे संपन्न

ठाणे (प्रतिनिधी) : काचबिंदू म्हणजे डोळ्यातील दाब वाढल्याने डोळ्याचा नसेला (optic nerve) लागणारी इजा. हा आजार अधिकपणे अनुवंशिकतेने होणारा असून, योग्य उपचार वेळीस न झाल्यास अंधत्वाकडे नेणारा आहे. हया आजाराची काही लक्षणे सुरुवातीस जाणवत नसल्याने, अधिक  इजा  झाल्यावरच रुग्णाला ह्याचा परिणाम जाणवतो व त्या परिस्थितीत ह्याला नियंत्रणात आणणे अवघड होत जाऊन अनेकांना अंधत्वाला सामोरे जावे लागते. सर्व साधारण जगभरात शंभरात ३ जणांना ह्या रोगाला सामोरे जावे लागते. ठाण्यातील श्रीरामकृष्ण नेत्रालयमध्ये अशा तीन रूग्णाना निवडून त्यांच्यावर केलेली आयस्टेन्टची शस्त्रक्रिया य़शस्वी झाली आहे.

काचबिंदू निदान व उपचारात अग्रणी असलेल्या श्रीरामकृष्ण नेत्रालय मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेली अनेक वर्षे होत आहे. याबाबत माहिती देताना नेत्रशल्यचिकित्सक ड़ॉ नितिन देशपांडे म्हणाले की, ओपन एंगल ग्लूकोमा हा जगात सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा काचबिंदूचा प्रकार आहे. डोळ्यांचा पुढील भागात ट्रेबेकुलर मेशवर्क ह्या  जाळीतून पाण्याचा निचरा डोळ्याबाहेर होत असतो. अनुवांशिक कारणामुळे ह्या जाळीचे गुणधर्म बदलतात ज्यामुळे डोळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत  नाही. ह्यामुळे डोळ्यातील पाण्याचा दाब वाढून  डोळ्याचा नसीला (optic nerve) इजा होतो.

श्रीरामकृष्ण नेत्रालय आईस्टेंट (istent)  व आईस्टेंट इंजेक्ट (istent inject)  हे ग्लूकोज नावाच्या अमेरिकन कंपनीचे माइक्रो इंन्सीजन ग्लूकोमा सर्जरी डिवाइस (micro incision glaucama surgery device) सर्वप्रथम भारतात आणले. मानवी शरीरात रोपण होणारे हे उपकरण जगातील सर्वाधिक सुक्ष्म असून त्याला एफडीए, वीएसएची मान्यता प्राप्त आहे. जगभरात मान्यताप्राप्त असे हे तंत्रज्ञान आहे. भारतात पहिल्यांदा याचा वापर श्रीरामकृष्ण नेत्रालयमध्ये करण्यात आला.

आईस्टेंट हा डोळ्यातून पाण्याचा निचरा करणाऱ्या ट्रैब्यूलर मेशवर्कमध्ये गुंतविले जाते. त्यामुळे डोळ्यातील पाण्याचा अडकलेला मार्ग खुला होतो व त्यामुळे डोळ्यातील, ह्या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. हे डिवाइस सुक्ष्म असल्याने ही शस्त्रक्रिया सुक्ष्म छेदातून होते. मोतिबिंदू शस्त्रक्रिये बरोबर ह्या डिवाइसचे रोपण करणे शक्य असल्याने एकाच सुक्ष्म छेदाने दोन्ही शस्त्रक्रिया पार पडतात, अशी माहीती डॉक्टरानी दिली. यावेळी डॉ. प्राजक्ता देशपांडे, डॉ. सुहास देशपांडे, कंपनी प्रॉडक्ट हेड सैकब दत्ता हे उपस्थित होते.

डॉक्टरानी पुढे सांगितले की, यामुळे डोळ्याचा दाब कमी झाल्याने डोळ्याच्या नशीची झीज नियंत्रणात आणता येते. तसेच ही शस्त्रक्रिया करताना डोळ्यावर  कोणतेही अतिरिक्त छेद घेण्याची गरज  भासत नाही. त्यामुळे जखम भरण्यास अगदी कमी अवधी लागतो. तसेच सर्जिकल ग्रेड टायटानियम ह्या धातूपासून बनलेल्या ह्या डिवाइसमुळे डोळ्याला कोणतीही हानी पोहोचत नाही, असेही डॉक्टरानी पुढे सांगितले.

ग्लुकोमा हा आजार भारतातील अंधत्व येण्याचे तिसरे महत्वाचे कारण आहे. श्रीरामकृष्ण नेत्रालयमध्ये ज्या तीन रूग्णांसाठी हे वापरले गेले ते तिघेही रूग्ण ठाण्याचे रहिवाशी असून ऑपरेशननंतर दृष्टीबाबत असलेला त्यांचा त्रास कमी झाला आहे. भारतात आता इतरत्र देखील हे तंत्रज्ञान वापरण्यास कंपनी सज्ज झाली आहे.