शिक्षकांचा बुलंद आवाज हरपला

शिक्षकांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षकांचा बुलंद आवाज गेला अशी प्रतिक्रिया शिक्षकवर्गातून उमटली आहे.

मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात रामनाथ मोते यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच शैक्षणिक, राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होऊ लागली. कोकण शिक्षक मतदारसंघातून ते आमदार म्हणून दोन वेळा निवडून आले होते. शिक्षकांचे प्रश्न-समस्या, शिक्षण क्षेत्र, मराठी शाळांच्या समस्या आदी प्रश्नावर लढणारा लढवय्या माणूस म्हणजे रामनाथ मोते यांची ओळख होती.