विधानसभेची ‘ही’ प्रश्नपत्रिका होतेय नेटकऱ्यांमध्ये वेगाने व्हायरल

विधानसभेची ‘ही’ प्रश्नपत्रिका होतेय नेटकऱ्यांमध्ये वेगाने व्हायरल

ठाणे (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असतानाच विधानसभा निवडणुकीची एक प्रश्नपत्रिका सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेची ठरत आहे. निवडणुकीसाठी दिग्गज पक्षांनी आपले जाहीरनामे, वचकनामे, संकल्पपत्रे जाहीर करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यातच सोशल मिडीयावर विधानसभेच्या निवडणुकीची एक भन्नाट प्रश्नपत्रिका वेगाने व्हायरल होत आहे. सत्तारूढ पक्षाच्या कारभारावर व नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर २० गुणांचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले असून, ती सोडवणाऱ्यास सुज्ञ मतदार घोषित करण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सुज्ञ जनता आयोजित; प्रथम पंचवार्षिक विधानसभा परीक्षा २०१९-२० या नावाने प्रश्नपत्रिका तयार करून ती समाजमाध्यमवर व्हायरल करण्यात आली. या प्रश्नपत्रिकेत भन्नाट असे सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले असून एकूण २० गुणांची ही प्रश्नपत्रिका असून रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या, आणि जोड्या लावा नमूद केले आहे.  प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाची उत्तरे देणाऱ्यास व या सर्वांतून बोध घेऊन योग्य पक्षास मतदान करणाऱ्यास सुज्ञ मतदार घोषित केले जाईल. अशी टीपहि नमूद करण्यात आली .  

ही प्रश्नपत्रिका ती खालील प्रमाणे :- 
प्र.१ला) योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.(६गुण)
१) शिवस्मारक व बाबासाहेबांचे स्मारक बांधू असे सांगून जनतेला यांनी फसवले. (भाजपा / शिवसेना / दोन्हीही)
२) युती सरकारच्या काळात एकूण ___ शेतक-यांनी आत्महत्या केली.(१५ हजार/ १६ हजार)
३) दारूच्या बाटलीला महिलेचे नाव दिल्यास खप वाढेल असे वक्तव्य ___ यांनी केले. (गिरीश महाजन / गिरीश बापट)
४) ___ या सरकारने जनतेला गाजर दाखविले.(मोदी सरकार / फसनवीस सरकार / दोन्हीही)
५) ___ सरकारने शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा प्रयत्न चालू केला आहे. (मोदी सरकार / फसनवीस सरकार | दोन्हीही)

६) ___ सरकारने महाराष्ट्राचा कांदा निर्यातबंदी करून पाकिस्तानचा कांदा आयात केला.
(मोदी सरकार / फसनवीस सरकार / दोन्हीही)

प्र.२ रा) एका वाक्यात उत्तरे लिहा. (९गुण)
१) कोणत्या पक्षाचे आमदार पाच वर्ष खिशात राजीनामे घेऊन फिरत होते ?
२) आता युतीचा कटोरा घेऊन मि कोणाच्याही दारात जाणार नाही' अशी फुसकी घोषणा देणाऱ्या
शेणाप्रमुखाचे नाव काय ?
३) 'तुरीला एवढा भाव दिला तरी रडतात साले' असे शेतकऱ्यांना बोलणाऱ्या भाजप नेत्याचे नाव काय?
४) 'तुम्हाला आवडणारी मुलगी मि पळवून आणून देतो' असे सांगणाऱ्या भाजपच्या कमी उंचीच्या आमदाराचे नाव
काय?
५) खेकड्याने धरण फोडले' या जागतिक संशोधन करणाऱ्या शिवसेना नेता सावंत यांचे संपूर्ण नाव काय?
६) 'पवार साहेब माझ्या ह्रदयात आहेत' असे म्हणून पळ काढणाऱ्या (पक्षांतर करणाऱ्या) पाच पळपुट्या नेत्यांची
नावे सांगा?
७) 'भाजपमध्ये जाणाऱ्यास मतदान करू नका' म्हणून बिरोबाची शपथ घालणारा नेता कोण ?
८) बाळासाहेब ठाकरे यांचे 'बजाओ पुंगी हटाओ लुंगी' या सूचनेला लुंगी घालून मोडीत काढणाऱ्या त्याच्या नातुचे नाव
काय?
९) १५ लाख खात्यात जमा करतो म्हणून जनतेला गंडा घालणाऱ्या दोन राष्टीय नेत्यांची नावे सांगा?

सदर प्रश्नपत्रिकेत ३ रा प्रश्न योग्य जोड्या लावण्यावर विचारण्यात आला आहे.