तिवरे: प्रभावित वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर

तिवरे: प्रभावित वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर

चिपळूण (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटी प्रकरणाने प्रभावित भागात मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु आहे. परिसरातील खंडित झालेला वीज पुरवठा आज संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे.

तिवरे धरणफुटी प्रकरणी चिपळूण प्रभावित क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. परिसरातील पोल दुरुस्ती आणि कंडक्टर स्ट्रिनिंगसाठी अंदाजे ४० कामगार काम करीत आहेत. भरपावसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचा कर्मचारीवर्ग  प्रयत्नशील आहे. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी सदर ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही यांनी विद्युत यंत्रणेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महावितरणच्या सूत्रांनी आज संध्याकाळपर्यंत पुरवठा पुनर्संचयित केला जाईल अशी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही येथील मदत व बचाव कार्याचा आढावा घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासकीय यंत्रणे मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. येथील दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.