उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठामपाची दिव्यात कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठामपाची दिव्यात कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्तारुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिवा स्टेशन ते दिवा सर्कल परिसरातील अनधिकृत बांधकामावर बुधवारी ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील ६ इमारतीमधील १२३ सदनिका व ४३ गाळे निष्कसित करण्यात आले असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर पडले गांव, येथे करण्यात आले आहे. रस्तारुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिव्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. 

सदरची कारवाई उपआयुक्त मनीष जोशी, अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अलका खैरे, चंद्रेश जाधव, विजयकुमार जाधव, फारूख शेख, कार्यालयीन अधीक्षक दत्ता गोंधळे, कार्यकारी अभियंता संजय कदम, धनाजी मोदे उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली.