ज्येष्ठ पत्रकार अभेराजभाई चौधरी यांचे दु:खद निधन

ज्येष्ठ पत्रकार अभेराजभाई चौधरी यांचे दु:खद निधन

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण शहरातून प्रकाशित होणाऱ्या गुजराती साप्ताहिक ‘कल्याण प्रजाराज’चे संस्थापक-पत्रकार, पत्रकार विष्णुकुमार चौधरी यांचे वडील, तथा ज्येष्ठ पत्रकार अभेराजभाई चौधरी यांचे आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने कल्याण येथे राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

आज (शुक्रवार) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अभेराज चौधरी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर कल्याण येथील बैल बाजार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील विविध स्तरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. अभेराज चौधरी यांनी कल्याण येथून प्रकाशित होणाऱ्या व ठाणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अग्रभागी असलेल्या ‘कल्याण प्रजाराज’ हे गुजराती भाषेतील साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले होते. त्यांचे पुत्र विष्णुकुमार चौधरी हे संपादक म्हणून काम पाहत आहेत. अभेराज चौधरी यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा-सून, नातू-पणतू असा परिवार आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.