मुक्त रिक्षा परवाने बंद करण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे साकडे 

मुक्त रिक्षा परवाने बंद करण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे साकडे 

कल्याण (प्रतिनिधी) : 
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रिक्षाचालकांवर कोसळत असलेल्या आर्थीक
संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या परिवह विभागाने रिक्षा संदर्भातील मुक्त परवाना धोरण बंद करुन  विद्यमान रिक्षा चालकांवर कोसळलेल्या आर्थीक संकटावर मात करावी अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे .

राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षांची बेसुमार वाढ झाली आहे. या धोरणामुळेच या व्यवसायात परप्रांतियांचीही कमालीची घुसखोरी झाली आहे. परिणाम स्वरुप शहरी भागातील रिक्षांच्या बेसुमार वाढीमुळे वाहतुक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी ध्वनी आणि वायु प्रदूषणाचीही समस्येत वाढ झाली आहे. रिक्षांच्या वाढीमुळे रिक्षा व्यवसायीकांचा व्यवसायच धोक्यात आल्यामुळे रिक्षाचालकांना आर्थीक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून मुक्त रिक्षा धोरण बंद करण्याची मागणी सदर  निवेदनात करण्यात आली आहे .

अनिल परब यांच्या विधान भवनातील दालनात  त्यांना या मागणीचे निवेदन देते समयी राजेंद्र देसाई, फैय्याज जावरे, नवी मुंबईचे मनोहर गायके, रमेश जाधव, बबलू खान आदी  मान्यवर  उपस्थित होते.