पर्यावरण दिनानिमित्त कल्याणमध्ये वृक्षारोपण 

पर्यावरण दिनानिमित्त कल्याणमध्ये वृक्षारोपण 

कल्याण (प्रतिनिधी) : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये विविध संस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अंतर्गत कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुहेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

कोरोना काळात आपल्या जवळच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना ऑक्सीजन अभावी व कोरोनामुळे आपल्याला गमवावे लागले. आपल्या आप्तस्वकीयांची आठवण म्हणून,  किमान १ झाड लावण्याचे आवाहन जेष्ठ शिक्षक अंकुर आहेर आणि इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली (प.) तसेच इतिहास संकलन समिती, डोंबिवली व इकोड्राईव्ह यंगस्टर्स, कल्याण यांनी एकत्र येऊन, 'आठवणींची झाडे' लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.

त्याचप्रमाणे कचोरे येथील नेतिवली टेकडीवरील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुहेच्या परिसरात स्थानिक नगरसेविका तथा कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखा राजन चौधरी यांनीही जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून वृक्षारोपण केले.

दरम्यान, ठवणींचे झाड या अभियानात सहभागी होत वृक्षारोपण करून ९७७३४३०६८४ या क्रमांकावर फोटो पाठविण्याचे आवाहन इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे महेश बनकर यांनी केले आहे.