कल्याणात स्वामी समर्थ मठात तुळशी विवाह संपन्न

कल्याणात स्वामी समर्थ मठात तुळशी विवाह संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, फॉरेस्ट कॉलनी, मिलिंद नगर, कल्याण (पश्चिम) येथे शनिवारी रात्री तुळशी विवाह पूजात्सव पंरापारिक पध्दतीने धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पुजोत्सव असुन कार्तिक शुध्द एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस  ही दिवाळी असते. कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्षूच्या या जागुतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रुढी असल्याची धार्मिक महिती गुरुवर्य श्री मोडक महाराज यांनी तुळशी विवाहा निमित्ताने जमलेल्या स्वामीभक्त भाविकांना दिली.

या क्रार्यक्रम प्रसंगी सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत मंगलमय वातावरणात तुळशी विवाह विधीयुक्त पध्दतीने मंगल अष्टाकांच्या गजरात अक्षता टाकुन संपन्न करण्यात आला. तुळशी विवाहासाठी सोशल डिस्टन् नियमाचे पालन करीत जमलेल्या वर्हाडी मंडळीनी प्रसाद देण्यात आला.