कल्याणात आढळला दोन तोंडाचा विषारी साप

कल्याणात आढळला दोन तोंडाचा विषारी साप

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी गृहसंकुला लगतच्या फुटपाथजवळ बुधवारी दोन तोंड असलेले विषारी घोणस जातीच्या सापाचे पिल्लू आढळून आले. सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे पिल्लू आढळले.

कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीलगत असलेल्या फुटपाथजवळ बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास नेहेमीप्रमाणे काही नागरिक फिरण्यास आले तेव्हा तेव्हा त्यांना हे सापाचे पिल्लू आढळून आले. घोणस साप हा प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे. स्थानिक प्राणीमित्र हरीष जाधव व संदिप पंडित यांनी या घोणस प्रजातीच्या छोट्या पिल्लाला पकडून सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या ताब्यात दिले. साधारणत: निर्सगात लाखात एखादे असामान्य व दुर्मिळ जीव जगासमोर येतो. 

कल्याणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे व वनपाल जाधव यांच्या ताब्यात या सापाला सोपविण्यात आले. पशुवैदयकीय अधिकारी डाॅ. धर्मा रायबोले यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. सदर साप सुस्थितीत असून त्यांच्या देखरेखीखाली आहे. सध्या ही घोणस वाॅर रेस्क्यू फाॅऊंडेशनच्या ताब्यात सांभाळण्यासाठी देण्यात आली आहे. कल्याणच्या वन विभागाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत आम्ही सांभाळ करू, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली आहे.