गोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटप 

गोवेली-ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटप 

टिटवाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा संलग्न कल्याण तालुकाच्या वतीने गोवेली येथील ठाकूर पाडा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता करता-करता संघटनेमार्फत समाजपयोगी कार्याचा वसा घालून दिला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तीना मदतीचा हात पुढे करण्यासाठी नेहमीच आशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. समाजातील एकही विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप, अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचे वाटप, पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट वाटप आणि आज आदिवासी विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करून समजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. 

याप्रसंगी तालुका अध्यक्ष जैतू मुठोळकर आदिवासी पड्यांना जोडणारे रस्ते नसल्यामुळे स्थानिकांचा विकास खुंटल्याची व्यथा मांडली. रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळूनही स्थानिकांच्या आडमुठेपणामुळे रस्ता राखडल्याचे शोकांतिका जिल्हा परिषद सदस्य जयक्षी सासे यांनी व्यक्त केली. मात्र पुढल्या कार्यक्रमासाठी गावातील रस्ते बनवले जातील अशी ग्वाही देखील सासे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. 

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, तालुका अध्यक्ष मुठोळकर, जिल्हा परिषद सदस्य जयक्षी सासे, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचौरे, गोवेली ग्रामपंचायत सरपंच पूजा जाधव, समाजसेवक दिपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य अण्णा हिंदोळे, जयवंत हबळे, गोविंद कदम, सिद्धार्थ गायकवाड, राजेश जाधव, नाना म्हात्रे, विलास भोईर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी पूरग्रस्त पत्रकार विलास भोईर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अर्थिक मदत देण्यात आली.