अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यापूर्वीच केडीएमसीने उध्वस्त केला

अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यापूर्वीच केडीएमसीने उध्वस्त केला

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकाजवळ उभारण्यात येणारा एका मोबाईल कंपनीचा डाव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाने हाणून पाडला आहे.

सुभाष चौकाजवळ इंडस या मोबाईल कंपनीने अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्याचा घाट घातला होता. ‘ब’ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांना ही बातमी कळताच आजच त्यांनी त्वरित सुभाष चौकात जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते बांधकाम तोडले.

अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारला गेल्यास ते तोडण्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात. हे मोबाईल कंपन्यांना माहित असल्यामुळेच ते परवानगी न घेताच मोबाईल टॉवर उभारतात, अशी माहितीही गुप्ते यांच्याकडून मिळाली.