ठाणे जिल्ह्यातील २० शाळा अनधिकृत जाहीर 

ठाणे जिल्ह्यातील २० शाळा अनधिकृत जाहीर 

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या २० अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेने १)आदर्श विद्यालय, लोढा (इंग्लिश), निळजे, कल्याण. इ.९वी ते १०वी (इंग्रजी), २)आदर्श विद्यालय, लोढा (हिंदी) निळजे, कल्याण. इ.९वी, इ.१०वी (हिंदी), ३)आदर्श विद्यालय, लोढा (मराठी) निळजे, कल्याण. इ.९वी इ.१०वी (मराठी), ४)पोदार इंटरनॅशनल स्कूल (CIE) उंबर्डे, कल्याण, इ.९वी इ. १०वी (इंग्रजी), ५)प्रशिक स्पेशल स्कूल, मिरा-भाईन्दर इ.९वी इ.१०वी (मराठी), ६)भारतीय जागरण इंग्लिश सेकंडरी विद्यालय, कोपरखैराणे, नवी मुंबई इ.९वी इ. १०वी (इंग्रजी), ७)श्री साईज्योत सेकंडरी स्कूल, कोपरखैराणे, नवी मुंबई. इ. ८ वी इ. ९ वी इ. १०वी (इंग्रजी), ८)अल मुमिनाह सेकंडरी स्कुल बेलापूर, नवी मुंबई इ.९वी इ. १०वी (इंग्रजी), ९)ज्ञानदिप सेवा मंडळ सेकंडरी इंग्लिश स्कूल, करावे, नवी मुंबई. इ.९वी (इंग्रजी), १०)आरक्वॉम इस्लामिक स्कूल, ठाणे इ.९वी (इंग्रजी), ११)रफिक इंग्लिश हायस्कूल, ठाणे इ. ९वी इ. १०वी (इंग्रजी), १२)स्टार इंग्लिश हायस्कूल, ठाणे इ.९वी इ. १०वी (इंग्रजी) १३)आदर्श विद्यालय, सेकंडरी (हिंदी) दिवा, ठाणे इ.९वी इ.१०वी (हिंदी), १४)नालंदा हिंदी विद्यालय, ठाणे इ.९वी इ.१०वी (हिंदी), १५)होली मारिया कॉन्व्हेंट हायस्कूल, ठाणे इ.९वी (इंग्रजी), १६)स्वामी समर्थ हायस्कूल, वसार, भाल, अंबरनाथ. इ.९वी इ.१०वी इ. ११ वी ते १२वी (मराठी), १७)नवभारत इंग्लिश हायस्कूल, अंबरनाथ. इ.९वी इ. १०वी (इंग्रजी) १८)प्रगती विद्यामंदिर, चिखलोली अंबरनाथ. इ.८वी इ.९वी इ. १०वी (मराठी) १९)आतमन ॲकॅडमी, ठाणे इ.९वी इ. १०वी (इंग्रजी), २०)अरुणज्योत विद्यालय, ठाणे इ.९वी इ. १०वी (हिंदी) या २० शाळा अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे. 

सदर अनधिकृत माध्यमिक शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवु नये. पालकांनी सदर अनधिकृत  माध्यमिक  शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पालकांची राहील. तसेच संबंधित संस्था चालकांनी त्यांचे संस्थेमार्फत सुरु असलेल्या अनधिकृत माध्यमिक शाळा/वर्ग तात्काळ बंद करुन तसे हमीपत्र शिक्षण विभाग (माध्य) जिल्हा परिषद ठाणे या कार्यालयास सादर करावे. सदर अनधिकृत माध्यमिक शाळा/वर्ग तात्काळ बंद न केल्यास संबंधित संस्था चालकाविरुध्द बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.