मुलांना सैन्यात पाठविण्यासाठी ‘असाही’ अनोखा उपक्रम

मुलांना सैन्यात पाठविण्यासाठी ‘असाही’ अनोखा उपक्रम

ठाणे (प्रतिनिधी) : 
सुधागड तालुक्यातील मुलांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी ठाणे येथील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाने टाटा कॅपिटल या कंपनीच्या सहकार्याने ३२ युवकांना संधी प्राप्त करून देत अनोखा उपक्रम राबविला आहे. या ३२ जणांमध्ये २४ मुले व ७ मुलींचा समावेश असून त्यांना सातारा येथील मेस्को अ‍ॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाला या उपक्रमासाठी सुधागड तालुका मराठा समाजाने देखील सहकार्य केले आहे. संघाचे सरचिटणीस राजू पातेरे व जीवन साजेकर यांनी या मुलांसोबत सातारा येथे जाऊन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यकारी मंडळाच्या मेहनतीने सुरू केलेल्या या शिबिरासाठी सुधागड मराठा समाज अध्यक्ष गणपत सितापराव व कार्यकारिणी यांचे सहकार्य लाभले.

प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेले मुलांमध्ये शुभम श्रीकृष्णा ठाकूर, अजय भरत चव्हाण, भावेश मधुकर टाकलेकर, विजय वसंत नाडकर, शुभम पद्माकर काटकर, सौरभ दीपक काळभोर, सौरभ संजय निगुडसे, चेतन विलास गोफन, पार्थ प्रसाद यादव, रितीक अनंत पुजारी, शुभम जयराम वरंडे, वैभव सुभाष म्हस्के, शुभम मिलिंद थले, संदेश संतोष दळवी, कृष्णा बबन मोने, अतुल चंद्रकांत वालज, प्रमोद संजय वाघमारे, दिपेश केशव पवार, प्रफुल्ल नरेश देशमुख, कल्पेश किरण भोईर, स्वप्नील सीताराम राजीवडे, प्रतिकेश भरत शिंदे, वृषाल रघुनाथ जवरत, सौरभ मनोहर मांदाडकर यांचा तर युवतींमध्ये प्रियंका मोरेश्वर लांगी, पायल घनश्याम वाळंज, तुप्ती अरुण चव्हाण, संचिता दत्ताराम कदम, नम्रता संजय पवार, पूर्वा विनेश भोईर, ऋतुजा राजु पातेरे यांचा समावेश आहे.