तकदीर दशरथ काळण यांच्यावतीने लसीकरण शिबिराचे आयोजन

तकदीर दशरथ काळण यांच्यावतीने लसीकरण शिबिराचे आयोजन

कल्याण (अक्षय शिंदे) : हेदुटने गावचे माजी सरपंच तथा मनसे शहर संघटक तकदीर दशरथ काळण यांच्यावतीने प्रभागातील नागरिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन हेदुटने गावातील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते. 

कोरोना अजून गेलेला नाही सामान्य नागरिकांसाठी रेल्वे, मॉल अश्या विविध ठिकाणी लसीचे दोन डोस अनिवार्य ठरत आहेत. परंतु लसीकरण केंद्रावर असणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांचा पैश्यासोबत वेळही खर्च होतो. नागरिकांना लसीकरण केंद्रावर फेऱ्या माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन तकदीर दशरथ काळण यांच्या प्रयत्नाने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावत लसीकरण करून घेतले. जास्तीत जास्त लसीकरणाचा स्लॉट काळण यांच्या वतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. 

यावेळी हेदुटणे गावातील माजी सरपंच दिलीप पाटील, डॉक्टर अनिल रत्नाकर, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद काळण, विश्वास पाटील, फकीरा काळण, जयेंद्र काळण, काळूराम काळण, चैनु पाटील, सुनिल पाटील, देवा भंडारी, अंकलेश काळण, दिगंबर काळण, इंद्र्जीत काळण, किशोर भंडारी, विठ्ठल कुंभारकर विश्वनाथ भंडारी तसेच कोळेगांव विकास प्रतिष्ठान आणि जय हनुमान व्यायाम शाळा कोळेगांवचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.